रविवारी शाम ए गझलच्या मैफलीत पतंजली मादुसकर आणि श्रुती करंदीकर यांनी आयोजिलेल्या खास कार्यक्रमात प्राजक्ता सावरकर-शिंदे या जबलपूर येथे bsnl मध्ये कार्यरत असलेल्या तरल आणि सफाईदार आवाजाची देणगी असलेल्या गायिकेने खूब मैफल रंगवून उपस्थितांचा दिल खुश करून सोडला..
श्रीमती विजया जाधव गाटलेवार यांच्या कडून संगीताची तालीम घेतलेल्या प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी ज्या तयारीने गझलला आपल्या गळ्यातून जोजवत ठेवले हे ऐकता नक्कीच त्या आपले नाव संगीताच्या प्रातांत रोशन करतील याबद्दल शंका नाही.
गझलच्या पुण्यातील अभ्यासक, गुरू आणि उर्दू गझलेचा मतला आणि त्याची नजाकत जाणणाऱ्या शशिकला शिरगोपिकर यांनी आपल्या पूर्ण उपस्थितीने प्राजक्ताच्या सादरीकरणाला दाद देऊन तिच्याकडून यापुढे अधिक उत्तमोत्तम गझल ऐकायला मिळतील याबद्दल समाधान व्यक्त केले.
पतंजली मादुसकर यांच्याकडे त्या सध्या मार्गदर्शन घेत आहेत.
या गझलच्या मैफलीत काही गझल कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर यांनीही सादर केल्या.
सर्वच मैफलीची तबला संगत पं.रामदास पळसुले यांचे तयार शिष्य यश सोमण यांनी केली तर आपल्या उत्तम पेटीवादनातून कुमार करंदीकर यांच्या सफाईदार जादुई बोटांची करामत रसिकांना अनुभवता आली.
-सुभाष इनामदार, पुणे
Subhashinamdar@gmal. com



