Sunday, June 23, 2024
तीन मिनीटात जादू करणारे ..बाबूजी
रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष गाणे यातून समग्र बाबुजी..म्हणजे गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांची अजरामर करणारी कारकीर्द रसिकांच्या हृदयात कोरली गेली..
अभिजात संगीत कलेची साधना केलेले बाबूजी यांनी सुगम संगीतात केलेली कामगिरी .. ऐकताना साधी आणि सोपी ..पण तीच गाणी बारकाईने पाहिली तर किती प्रतिभा प्रकट करणारी..याची प्रचिती ..एक धागा सुखाचा.. हा स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या चालीतील
बारकावे समजून सांगणारा कार्यक्रम डॉ. मृदुला दाढे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत २२ जून २०२४ रोजी राजलक्ष्मी सभागृहात तुडुंब भरलेल्या आणि बाबुजी प्रेमी रसिकांसमोर सादर करून बाबुजी मनामनात पोचविले..
बाबुजी यांचेकडे संगीत कलेची पुरेपूर माहिती होती आणि चाल देण्यासाठी आवश्यक असणारी तंत्राची हुकूमत होती यामुळे त्यांची गाणी चिरस्थायी झाल्याचे डॉ. दाढे यांनी विविध गाण्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण करून रसिकांना त्याची महती पटवून दिली.
शब्दांचे लालित्य , माधुर्य चालीत उमटले पाहिजे तर तुम्ही महान संगीतकार आहात.. शब्दांची मोडतोड तर दूरच पण त्यांनी शब्दांना खरचटू देखील दिले नाही..एकही ओरखडा त्या भावनेवर त्या काव्यावर येत नाही.. ती भावना अधिक लखलखीत होऊन तुमच्यापर्यंत कशी येईल हे त्यानी पाहिले.. म्हणून गदिमा यांचे श्रेष्ठ काव्य तितक्याच तोलामोलाच्या संगीतकाराच्या हातात पडल्यामुळे हा स्वरांचा ताजमहाल उभा झाल्याचे डॉ . मृदुला दाढे सांगतात..
त्यांच्या चालीचे वैशिष्टय म्हणजे पहिल्या दोन कडव्यांची एकसारखी चाल तर तिसऱ्या कडव्याची चाल वेगळ्या सुरावटीत असते..
गाण्याचा प्रसंग आणि त्यातील शब्द याना योग्य न्याय देऊन त्यांचे गाणे इतके उत्तम बांधलेले असते की तुम्ही ती म्हणताना तसूभर देखील बदल करू शकणार नाही..किंवा वेगळी ट्रीटमेंट देऊ शकणार नाही..
त्यांच्या गाण्यांनी रसिकांच्या मनात ..एक धागा सुखाचा कायम विणला म्हणून तर त्यातून काय सुख मिळाले याचा शोध बाबूजींच्या गाण्यातून घेणे हाच कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे दाढे यांनी इथे म्हटले.
हृदयी प्रीत जागते..जाणता अजाणता..
कारे दुरावा..कारे अबोला..अपराध माझा ..
काल मी रघुनंदन पाहिले..
इथून दृष्ट काढते...निमिष एक सांग तू..
ज्योती कलश झलके..
दिवसा मागुनी दिवस चालले.. हे वेगळे राग वापरून केलेले गाणे..
त्या तिथे..पलीकडे..
एकाच या जन्मी जणू..
या सुखांनो या..
याशिवाय दोन लावण्याही सादर झाल्या
काही धरीला मजवर राग..
कुणीतरी बोलवा दाजिबाला..
त्यातूनच ते किती महान संगीतकार - गायक होते याचा ठसा आपल्या सलग तीन तासाच्या प्रवासात उमटविला.
धनंजय कुरणे यांनी आपल्या संग्रहातील रेकॉर्ड प्रत्यक्ष ऐकवून तो काळ पुन्हा त्या सभागृहात आणला आणि कार्यक्रम अधिक परिणामकारक केला. कुरणे यांचे नेमके प्रश्न आणि त्यानी सांगितलेले सुधीर फडके यांचे आयुष्य त्यांच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा उभा राहतो..
सुधीर फडके व्यक्ती आणि साधक म्हणून श्रेष्ठ होते ते रसिकांच्या मनात कायम लक्षात राहील.
यासाठी पुण्यातले दोन उत्तम साथीदार नरेंद्र चिपळूणकर ..संवादिनी..आणि राजेंद्र हसबनिस
यांनी दाढे यांच्या गाण्यांना तशीच तोलामोलाची साथ केली..त्यांच्याचमुळे हा कार्यक्रम विशेष दाद घेऊन गेला.. काळे यांची ध्वनिव्यवस्था योग्य न्याय देत होती..
कुरणे यांची वेगळी पण अभ्यासपूर्ण धाटणी आणि डॉ. मृदुला दाढे यांची गाण्यांची रसास्वाद करण्याची अधिक तीव्रता यातून दोन स्वतंत्र कार्यक्रमांची एकत्रित मेजवानी यातून मिळाली.
पण या तीन तासात दोघांनाही पुरेसा वेळ मिळाला नाही..हे ही स्पष्ट करायला हवे.
दाढे यांचे प्रत्येक गाण्याबाबतीतले व्यक्त होणे हेच खरे यामागचे मर्म आहे..त्यामुळे सुधीर फडके यांचे संगीतकार म्हणून नाव का आणि शतकातील महान संगीतकार ते ओळखले जातात ते यातून अधिक लक्षात आणण्यात हा कार्यक्रम मोठे काम करतो..त्याबद्दब डॉ. मृदुला दाढे यांचे मनापासून आभार मानावे लागेल.
एम डी प्रॉडक्शन च्या वतीने हा अतिशय उत्तम कार्यक्रम सादर झाला याबद्दल उदय मठकर आणि त्यांचे सहकारी यांचे आभार.. तसेच
हा कार्यक्रम आयोजन करण्यामागे सभागृहाचे विवेक पाध्ये आणि डिंगणकर यांचेही.
वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्
ही रेकॉर्ड लाऊन कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली.
असे याचे अनेक ठिकाणी प्रयोग व्हावेत..त्यातून नवी गाणी या पद्धतीने त्यासर होऊन तीही अनेक पिढ्या ऐकली जातील..यासाठी हा कार्यक्रम सर्वत्र सादर व्हावा असे वाटते.
ही आणि अशी गाणी जाणकारांनी ऐकावी..हीच सादरीकरणा मागील इच्छा असल्याचे शेवटी दाढे सांगतात..ही एक .. चळवळ.. आहे..
- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
तुम्ही संपर्क करू शकता..7021441810
Subscribe to:
Posts (Atom)







