श्रीनिवास संगीत
विद्यालयाने सुरु केला प्रमाणपत्र अभ्यासक्रम
गुरुपौर्णीमेनिमित्ताने
मैफलीचे खास आयोजन
शास्त्रीय संगीत,
अभंग आणि सुगम संगीतात आपली कलावंत म्हणून
स्वतःची वाटचाल सुरू ठेऊन सौ. जयश्री कुलकर्णी गेली अकरा वर्ष आपली कला एक गुरु
म्हणून शिष्य़ांच्या व्दारे वाढवित नेत आहेत..
नुकताच त्यांच्या
वडीलांच्या नावे म्हणजे श्रीनिवास संगीत विद्यालयाचा गुरूपौर्णीमा उत्सव २ ऑगस्टला
भारती निवासच्या सभागृहात रंगला..यावेळी घेतल्या गेलेल्या प्रमाणपत्र परिक्षेच्या
गुणवत्तापात्र शिष्यांना प्र.चिं.शेजवलकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली..
या कोर्सचे परिक्षक या नात्याने मुकुंदराज गोडबोले यांनी काम पाहिले..तर भालचंद्र
देव, विजय दास्ताने, जयंत साने आणि सौ. चारुशीला गोसावी यांचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना लाभले..या कार्सची विजेती म्हणून अश्विनी दाते हिला घोषित करुन
तिला मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले..
वल्लरी बखले आणि
चारुशीला अमृतकर यांनी भैरव रागातील विलंबीत एकतालातील ख्याल सादर केला. संगीता
चोरगे यांनी राग भूप आणि सारंग मधील रचना गायल्या.. सौ. उर्मिला ताम्हणकर आणि सौ.
जयश्री देशपांडे यांनी गुजरी तोडी रागातील बदिश पेश केली. शलाका ठोसर यांनी भूप रागातील
रचना सादर केली.
सर्व शिष्यांनी सुगम
संगीताचा बहारदार नजराणा उपस्थित रसिकांना देऊन आगळा आनंद दिला..शास्त्रीय
संगीताचा पाया पक्का करुन त्यावर सुगम संगीताची मखमल शिष्यांच्या गळ्यावर
चढविण्याचा प्रयत्न गुरु सौ. जयश्री कुलकर्णी सातत्याने करीत आहेत..संगीत
विद्यालयातील शिष्यवर्गाचा हा संगीतातील आविष्कार पाहण्यासाठी प्र.चिं.शेजवलकरांसह
मुकुंदराज गोडबोले आणि श्रीराम साठे खास उपस्थित होते.
मुकंदराज गोड़बोले
आणि विद्यालयाच्या संचालिका सौ. जयश्री कुलकर्णी यांनी याप्रसंगी उपस्थितांना आपल्या
सुस्वर गायनाची मेजवानी दिली..




Superb Sangeeta chorage and Anuja Patil..proud of you
ReplyDeleteThank you Pravin :)
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteThank you Pravin :)
DeleteThank you Pravin :)
DeleteThank you Pravin :)
DeleteThank you Pravin :)
Delete